Anushka Sharma Second Pregnancy: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. विरुष्काच्या घरी आता दुसऱ्या बाळाचे आगमन होणार आहे, असं एका इंग्रजी वृत्ताने माहिती दिली. विरुष्काच्या घरी २०२१ रोजी पहिल्या बाळाचे आगमन झाले होते. त्यानंतर दोन वर्षाने या कपर्ल्सनी चाहत्यांना आंनदाची बातमी दिली आहे. काही दिवसांपासून अणुष्का ही सार्वजनिक कार्यक्रमात अनुपस्थिती दाखवली यावरून देखील गरोदरपणाची माहिती समोर आली होती. वृत्तानुसार अणुष्का तीन महिने गरोदर आहे. ही बातमी खरी असल्याच अनुष्का आणि विराट लवकरच चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेयर करतील अशी अपेक्षा दोघांचे चाहते करत आहे. सध्या दोघांनीही याबाबत काही अधिकृत माहिती दिलेली नाही.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)