कोरोनाच्या वाढत्या केसेसचा परिणाम सिनेचित्रपटसृष्टीवर पण होत आहे. महामारीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यांनी चित्रपटगृहे बंद केली आहेत. काश्मिरी पंडितांची कथा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सिनेप्रेमींना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. अभिनेता अनुपम खेरचा आगामी चित्रपट 'द काश्मीर फाइल्स'ची (The Kashmir Files) रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबत माहिती दिली आहे. हा चित्रपट यापूर्वी 26 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)