OMG2 Teaser Date Out: OMG2 उर्फ ओह माय गॉड 2 ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर पुढील आठवड्यात रिलीज होणार आहे. अक्षय कुमारने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याने11 जुलै रोजी OMG2 टीझर रिलीज होईल या घोषणेसह चित्रपटाची एक छोटी क्लिप शेअर केली. अक्षयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय ‘हर हर महादेव’ म्हणत लोकांच्या गर्दीतून फिरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अक्षयने कपाळावर भस्म लावलेला दिसत असून तो भगवान शिवाचे प्रतीक असल्याचं दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन देताना अक्षयने म्हटलं आहे की, "#OMG2 टीझर 11 जुलैला प्रदर्शित झाला. 11 ऑगस्टला थिएटरमध्ये #OMG2." (हेही वाचा - Jawan Trailer: शाहरुख खानच्या जवान ट्रेलरची घोषणा लवकरच होणार; रेड चिलीज एंटरटेनमेंटने शेअर केलं मोशन पोस्टर, Watch)
११.०७.२०२३ 🙏 #OMG2Teaser out on July 11. #OMG2 in theaters on August 11. pic.twitter.com/MlYB0FUo9s
— Akshay Kumar (@akshaykumar) July 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)