Jawan Trailer: शाहरुख खानच्या जवान ट्रेलरची घोषणा लवकरच होणार; रेड चिलीज एंटरटेनमेंटने शेअर केलं मोशन पोस्टर, Watch
मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात रेड चिलीज एंटरटेनमेंटने एक रोमांचक अपडेट शेअर केले आहे. सध्या ट्विटरवर #JawanTrailer हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
- Read in
- मराठी
Jawan Trailer: अॅटली दिग्दर्शित शाहरुख खानच्या आगामी 'जवान' या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात रेड चिलीज एंटरटेनमेंटने एक रोमांचक अपडेट शेअर केले आहे. सध्या ट्विटरवर #JawanTrailer हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. प्रॉडक्शन हाऊसने एक मोशन पोस्टर सामायिक केले ज्यामध्ये जवानसह वॉकी-टॉकी दर्शविली आहे आणि 'घोषणा लवकरच येत आहे' असा उल्लेख केला आहे. जवान 7 सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Manoj Muntashir Shukla On Adipurush: 'आदिपुरुष' चित्रपटातील डायलॉग्सबद्दल मनोज मुंतशीरने मागितली माफी; म्हणाले, लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे मला मान्य आहे)
Stay Tuned...#JawanTrailer pic.twitter.com/BqM0kmxHLQ
— Red Chillies Entertainment (@RedChilliesEnt) July 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 08, 2023 02:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

