Mercedes-Benz G-Class भारतात लॉन्च झाली आहे. एका एक्स शोरुमने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीची सध्याची बाजारात सांगितली जाणारी किंमत 2.55 कोटी रुपये आहे. महत्वाचे असले की, SUV फक्त G400d व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याचाच अर्थ असा की, तिच्यात डिझेल इंजिन आहे. हे इंजिन इनलाइन-सिक्स-सिलेंडर टर्बोचार्ज केलेले डिझेल 330bhp आणि 700Nm टॉर्क निर्माण करते. नव्याएसयूव्हीचे भारतीय बाजारात कसे स्वाग होते याबातब उत्सुकता आहे. जाणून घ्या फीचर्स. Mercedes-Benz G-Class म्हणजे सन 2023 मध्ये मर्सिडीज-बेंझने भारतात लॉन्च केलेल्या दहा मॉडेलपैकी एक आहे. ब्रँडने आधीच AMG E 53 Cabriolet आणि AMG GT 63 S E ही मॉडेल्स भारतात लॉन्च केली आहेत.

कंपनीने या नव्या एसयूव्हीबद्दल माहिती देताना सांगितले की, मर्सिडीज-बेंझ जी-क्लास त्याच आयकॉनिक लुकमध्ये आहे. एसयूव्हीमध्ये अजूनही स्क्वेअर ऑफ बॉडीसह खास आहे. जे गोल हेडलॅम्प, एक्स्पोज्ड स्पेअर व्हील आणि साइड-हिंग्ड मागील दरवाजा यांसारख्या आयकॉनिक डिझाइन पाहायला मिळते.

व्हिडिओ

G-Class च्या Adventure Edition मध्ये रूफ रॅक, एक काढता येण्याजोगी शिडी, स्पेअर व्हील होल्डर, 18-इंच अलॉय व्हील्स, पूर्ण आकाराचे स्पेअर व्हील, लेदर इंटीरियर आणि बरेच काही मिळते. जी-क्लास अॅडव्हेंचर एडिशन 4 विशेष रंग निवडीसह पाहायला मिळते. एसयूव्हीची रचना पर्यावरणपूरक पद्धतींनी करण्यात आली आहे. यामध्ये पुनर्प्रक्रिया केलेले लाकूड फायबर असलेले संमिश्र साहित्य, 35.9 किलो उच्च दर्जाचे पुनर्नवीनीकरण केलेले प्लास्टिक आणि बरेच काही समाविष्ट आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)