विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्यासह अनेकांनी सध्या एका विचित्र ट्रेंड पहिला आहे. काही लोकांनी ट्विटरवर #VirushkaDivorce हा ट्रेंड व्हायरल करायला सुरुवात केली आहे. तर, एका प्रमुख माध्यमाने काही वर्षांपूर्वी एक लेख प्रसिद्ध केला होता, यामध्ये लग्नानंतर विराट व अनुष्का घटस्फोट (Divorce) घेत असल्याचे म्हटले होते. आता या लेखाचा आधार घेऊन #VirushkaDivorce हा हॅशटॅग व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. इतकेच नाही तर नेटिझन्सनी या लेखाचा वापर ही घटस्फोटाची बातमी पसरवण्यासाठी करायला सुरुवात केली आहे, मात्र त्यात तथ्य नाही. ही बातमी पूर्णतः खोटी आहे. अनुष्का आणि विराट दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात सुखी, आनंदी आहेत व ते घटस्फोट घेत नाहीत.
अनुष्का शर्माची वेबसिरीज 'पाताल लोक'वर जेव्हा टीका व्हायला सुरुवात झाली, तेव्हा ही गोष्ट सुरु झाली. भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी केवळ या सिरीजवरच टीका केली नाही, तर विराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, अशी मागणीही केली होती. मात्र अनुष्कासह या सिरीजच्या इतर निर्मात्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिली माही. त्यानंतर काही दिवसांनी आता हा ट्रेंड व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. 9 फेब्रुवारी, 2016 रोजी प्रकाशित झालेल्या एका लेखाची प्रतही एका ट्विटर वापरकर्त्याने शेअर केली आहे. (हेही वाचा: अनुष्का शर्मा हिला पहिल्यांदा पाहून नर्वस झाला होता विराट कोहली, जाणून घ्या विरुष्काच्या नात्यामधील काही खास गोष्टी)
दरम्यान, क्रिकेटपटू विराट आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांचे 11 डिसेंबर 2017 रोजी टस्कनी (Tuscany) येथे एका सुंदर ठिकाणी लग्न झाले. आधी एकमेकांना डेट केल्यावरच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता, मात्र लग्नानंतर त्यांचे नाते अधिकच मजबूत आणि गहिरे होत गेले. गेल्या काही वर्षांमध्ये हे जोडपे अनेकांसाठी #couplegoals बनले आहे. मात्र अजूनतरी 'Confirmed: Anushka Sharma-Virat Kohli split' हा लेख त्या माध्यमाने काढून टाकलेला नाही. पण काय फरक पडतो? आपणा सर्वांनाच माहिती आहे की, विरुष्का हे त्यांच्या स्वतःच्या स्वर्गात आनंदी आहेत आणि आम्हीदेखील त्यांच्या आनंदी वैवाहिक जीवनाची आशा करतो.
दावा:
नेटिझन्स ट्रेंड #VirushkaDivorce दावा करता आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा घटस्फोट घेत आहेत
निष्कर्ष:
विराट आणि अनुष्का घटस्फोट घेत नाहीत, व्हायरल होत असलेला लेख 2016 चा आहे.