Viral: यूपीच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती त्याच्या पत्नीने माहेरहून परत येण्यास नकार दिल्याने इलेक्ट्रिक टॉवरवर चढला. व्हिडीओमध्ये पोलीस त्याला समजावण्याचा प्रयत्न करताना आणि टॉवरवरून खाली येण्याची विनंती करताना दिसत आहेत. त्याची पत्नीही त्याला खाली येण्यास सांगते. व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी टॉवरवर चढलेल्या माणसाला टॉवरवरून खाली आल्यास त्या माणसाच्या समस्येवर तोडगा काढतील असे आश्वासन देताना दिसत आहे. घटनास्थळी पोहोचलेली पत्नीही पुढे आली आणि तिने त्याला मायक्रोफोनद्वारे सांगितले की, ती पतीसोबत राहणार आहे आणि कुठेही जाणार नाही. देशराज असे त्या व्यक्तीचे नाव असून प्रशासन आणि त्याच्या पत्नीने काही तास विनवणी केल्यानंतर देशराज अखेर टॉवरवरून खाली उतरला. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला  आहे. देशराजने आपल्या पत्नीला सोबत ठेवल्याबद्दल त्याचे कौतुकही केले जात आहे. एका ट्विटर वापरकर्त्याने, धर्मेंद्र असे लिहिले, कारण ही घटना शोले चित्रपटाशी जुळते. दुसर्‍या वापरकर्त्याने, देशराजचे कौतुक केले कारण वापरकर्त्याने लिहिले की सहसा, पती त्यांच्या पत्नीला माहेरी पाठवण्यासाठी आग्रही असतात, तर देशराजला अगदी उलट हवे आहे, त्याचे त्याच्या पत्नीवरील प्रेम प्रशंसनीय आहे.

पाहा व्हिडीओ:  

देशपालच्या घटनेसारखाच एक व्हिडिओ, नुकताच  छत्तीसगडच्या गनियारी येथून समोर आला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती तिच्या माहेरच्या लोकांनी मुलीला तिच्या पतीच्या घरी परत जाण्यास नकार दिल्याने ट्रान्समिशन टॉवरवर चढला होता. तो माणूस आपल्या पत्नीला आपल्या घरी परत घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता परंतु पत्नीच्या वडिलांनी नकार दिला ज्यामुळे त्या व्यक्तीला टॉवरवर चढावे लागले. जोपर्यंत त्याच्या पत्नीच्या कुटुंबाने त्याच्या अटी मान्य केल्या नाहीत तोपर्यंत तो व्यक्ती खाली आला नाही.