Viral Video: टोरंटोमध्ये रेल्वे ट्रॅकवर धावत होते दोन मुलं; अचानक मागून आली वेगवान ट्रेन, पुढे काय झालं? तुम्हीचं पहा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ
Two boys were running on a railway track (PC - Twitter)

Viral Video: ट्रेनच्या धडकेतून थोडक्यात बचावलेल्या दोन मुलांचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना कॅनडातील टोरंटो (Toronto) येथील आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ज्या परिस्थितीत मुले ट्रेनच्या धडकेतून बचावली आहेत, तो चमत्कारापेक्षा कमी नाही. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक रेल्वेच्या सुरक्षेबाबत विविध कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ हृदयाला भिडणारा आहे. कारण, या व्हिडिओमधील मुलं अगदी निरागस दिसत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दोन मुले रेल्वे रुळांमधून धावताना दिसत आहेत. अशातचं मागून एक ट्रेन वेगाने येत आहे. या घटनेत दोन्ही मुलं ज्या प्रकारे ट्रेनच्या धडकेतून बचावली ते दैवी चमत्कारापेक्षा कमी नाही! भयावह आणि श्वास रोखून धरणारा व्हिडिओ टोरंटो, कॅनडाचा आहे. जो ट्विटरवर मेट्रोलिंक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. (हेही वाचा - Cashew Shaped Egg: काजूच्या आकाराचे अंडे देणारी कोंबडी बनली सेलिब्रिटी; सेल्फी घेण्यासाठी लोक करत आहेत गर्दी, Watch Video)

मुलांच्या मागे असलेली ट्रेन ही कॅनडाच्या मेट्रोलिंक्स कंपनीची आहे. ट्रेनचा आवाज ऐकून दोन मुले रुळांवर धावू लागतात. मेट्रोलिंक्सच्या मते, टोरंटोमधील हंबर नदीवरील रेल्वे पुलावर वेस्टन रोडजवळ तीन मुले रेल्वे रूळ ओलांडून आली. ते ट्रेनच्या इतके जवळ आले होते की, त्यांना जीव गमवावा लागला असता. हा व्हिडिओ 20 मे च्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 च्या सुमारास असल्याचं म्हटलं जात आहे.

व्हिडिओमध्ये दोन्ही मुले सुरुवातीला अप आणि डाऊन लाईनच्या ट्रॅकच्या मध्यभागी धावत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. स्काय टी-शर्टमधला मुलगा पलीकडच्या लाईनकडे धावला. पण, पांढऱ्या टी-शर्ट घातलेला मुलगा ट्रेन ज्या रुळावरून येत होती त्याच रुळावरून धावू लागतो. तो रुळावरून निघून जातो. व्हिडीओवरून हेही कळते की, हे दोन्ही मुलं सोबत होते.

मेट्रोलिंक्सने व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे की, 'हा हृदयद्रावक व्हिडिओ रेल्वे ट्रॅकवर चालणे धोकादायक असल्याचे दाखवतो. टोरंटोमध्ये रेल्वे पूल ओलांडताना तीन मुले काही फूट अंतरावरून गंभीर दुखापत तसेच मृत्यूपासून बचावली. रेल्वे सुरक्षेबद्दल तुमच्या मुलांशी बोला.' युजर्स या व्हिडिओवर लहान मुलांच्या जागरूकतेबाबत कमेंट करत आहेत. काही वापरकर्त्यांनी त्यांना रेल्वे रुळांवर जाण्यापासून रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचा आग्रह धरण्याचे आवाहन केले आहे.