महिलेने मागवले फ्राइड चिकन, दिला 'तळलेला टॉवेल'; Food Delivery कंपनीचे धक्कादायक कृत्य (Watch Video)
फूड डिलिव्हरी कंपनीचे धक्कादायक कृत्य (Photo Credit Facebook)

सध्या वस्तूंसोबत अन्नपदार्थही ऑनलाइन घेण्याची क्रेझ वाढली आहे. ऑनलाईन ऑर्डर असो वा टेकअवे असो, याआधी अनेकदा अशा फूड पार्सलमध्ये भलत्याच गोष्टी डिलिव्हर झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आताही अशीच एक घटना समोर आली आहे. फिलीपिन्समधील (Philippines) एका महिलेने आपल्या मुलासाठी फ्राईड चिकनची ऑर्डर दिली होती, परंतु जेव्हा तिला पार्सल देण्यात आले तेव्हा लक्षात आले की, चिकनच्या एवजी भोजनालयाने चक्क फ्राईड टॉवेल (Deep-Fried Towel) दिला आहे. जेव्हा महिलेने चिकन म्हणून तो कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला समजले की, ते चिकन नसून टॉवेल आहे.

अलीक पेरेझ (Alique perez) नावाच्या महिलेने फेसबुकवर या घटनेबाबत तपशीलवार माहिती दिली आहे. तिने जॉलीबी (Jollibee) या प्रसिद्ध रेस्टॉरंटकडे या पार्सलची ऑर्डर दिली होती. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, 'मी माझ्या मुलासाठी चिकनची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर मी चिकन कापण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र मला ते जरा कठीण वाटले. त्यानंतर मी ते हाताने तोडण्याचा प्रयत्न केला आणि दिसून आले की त्यामध्ये तळलेला टॉवेल आहे. समोरील दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला.’

पेरेझने फेसबुकवर याचे फोटो तसेच व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यातून दिसून येते की, ती चिकनऐवजी, टॉवेल पाठवलेला आहे. या पोस्टमध्ये ती विचारते, ‘चिकनच्या पिठात टॉवेल कसा काय येऊ शकतो? आणि आलाच तर कोणी तो तळू कसा शकतो?’ या पोस्टवर अनेक लोकांनी तिला कंपनीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Viral Video: महिलेने उघड्या हाताने पकडला भयंकर मोठा साप; जरा संभाळूनच पाहा हा व्हिडिओ)

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनी आपले रेस्टॉरंट तात्पुरते बंद करेल, असे फास्ट फूड चेन जॉलीबीने (Jollibee) सांगितले आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रेस्टॉरंट त्या दिवसासाठी बंद केले गेले. जॉलीबी फूड्स कॉर्पने सांगितले की, घडलेल्या प्रकारची कसून चौकशी होऊल आणि कामगारांना ताकीद दिली जाईल की अशा घटनेची पुनरावृत्ती कधी होणार नाही. घडल्या प्रकाराबाबत पेरेझचा नुकसान भरपाई मिलेले का हे स्पष्ट झाले नाही.