कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) हळूहळू शिथिल करण्यात येत आहे. देशात अनलॉकचा (Unlock) तिसरा टप्पा सुरु आहे. या अंतर्गत टप्पाटप्याने अनेक सुविधा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालये कधी सुरु होणार हा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. दरम्यान एका वृत्तपत्राने 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत टप्याटप्याने शाळा-महाविद्यालये पुन्हा सुरु करण्यात येतील, असा दावा केला आहे.
'1 सप्टेंबर पासून संपूर्ण देशात शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात येतील,' अशी या बातमीची हेडलाईन आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ही बातमी चुकीची, फेक असल्याचे सांगितले आहे. शाळा-कॉलेज सुरु करण्यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे स्पष्टीकरण पीआयबीने ट्विटच्या माध्यमातून दिले आहे. (Indian Railways: 30 सप्टेंबरपर्यंत रेल्वे गाड्या रद्द केल्याची बातमी खोटी; रेल्वे मंत्रालयाने दिले 'हे' स्पष्टीकरण)
Fact Check By PIB:
दावा: एक अखबार ने दावा किया है कि सरकार 1 सितंबर से 14 नवंबर तक चरणबद्ध तरीके से स्कूल खोलने जा रही है#PIBFactCheck: ऐसा कोई निर्णय अभी तक सरकार द्वारा नहीं लिया गया है pic.twitter.com/JLcFTRhiAL
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 11, 2020
केंद्रीय गृहमंत्र्यांनी शाळा-कॉलेज सुरु करण्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे वृत्तपत्राने केलेला दावा अगदी चुकीचा आहे. सध्याच्या गाईडलाईन्सनुसार, शैक्षणिक संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.
कोविड-19 च्या धोक्यामुळे मार्चपासून शाळा-कॉलेजेस बंद करण्यात आले आहेत. दरम्यान सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन माध्यमातून शालेय शिक्षण सुरु आहे.