बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांचे काल (30 एप्रिल) निधन झाले. मुंबईतील Reliance Foundation Hospital मध्ये त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऋषि कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनाने बॉलिवूडकर हळहळले. तर चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. आपल्या दिलखुलास अभिनयाने ऋषि कपूर यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध कंगोरे असलेल्या भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. मात्र 'लव्हर बॉय' ही त्यांची प्रतिमा चाहत्यांना अधिक भावली. ऋषि कपूर यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडापटू यांच्यासह साऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करत ऋषि जी यांना आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान एका चाहत्याने श्रद्धांजली अर्पण करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. सुदर्सन पट्टनाईक (Sudarsan Pattnaik) असे त्याचे नाव असून तो Sand artist आहे. ऋषिजींचा मोठा चाहता असल्याने त्याने वाळूतून ऋषि कपूर यांचे सुंदर शिल्प साकारले आहे. या आकर्षक कलाकृतीचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. त्यावर त्याने सुरेख संदेश लिहिला आहे.
सुदर्शन याने ऋषि कपूर यांच्या सिनेमातील भूमिकेतील रुप साकारत संदेश लिहिला की, "Hero of Million Hearts. Om Shanti." या वाळू शिल्पाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांना श्रद्धांजली. माझे पुरी समुद्र किनाऱ्यावरील वाळूशिल्प."
पहा ट्विट:
Shradhanjali to veteran Bollywood actor #RishiKapoor, #HeroOfMillionHeart .My sand art at Puri beach. #OmShanti pic.twitter.com/4Mn4FmWAE8
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) April 30, 2020
ऋषि कपूर यांना 2018 मध्ये ऋषि कपूर यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले. सुमारे 11 महिन्यांपर्यंच्या उपचारानंतर ते भारतात परतले. मात्र त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली आणि अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली.