Viral Video: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये ड्युटीवर असताना पोलिसांचा मानवी चेहरा पाहायला मिळाला. शहरातील छोला दसरा मैदानावर रावण दहन (Rawan Dahan) पाहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. काही सेकंदातच त्यांची प्रकृती इतकी बिघडली की तो जमिनीवर कोसळले. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने बेशुद्ध झालेल्या व्यक्तीच्या आजूबाजूला जमलेल्या गर्दीवर नियंत्रण तर ठेवलेच, पण त्याला तातडीने सीपीआर देऊन त्याचा जीवही वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री भोपाळमधील छोला दशहरा मैदानावर रावण दहन करण्यात येत होते. रावणाचा वध पाहण्यासाठी हजारो लोक मैदानावर पोहोचले होते. दरम्यान, गर्दीतील एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. हा अचानक घडलेला प्रकार पाहून दसरा मैदानावर उपस्थित जनसमुदायामध्ये एकच गोंधळ उडाला.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याचे होत आहे कौतुक -
#Bhopal छोला दशहरा मैदान में रावण दहन के दौरान एक व्यक्ति को आया हार्ट अटैक, ACP ने CPR देकर बचाई जान, एक व्यक्ति अचानक नीचे गिर गया था तभी वहां ड्यूटी कर रहे ACP AJK अजय तिवारी ने सीपीआर देकर जान बचाई & ईलाज हेतु हॉस्पिटल पहुंचाया@DGP_MP @MPPoliceDeptt @CMMadhyaPradesh pic.twitter.com/m5GK6HKWLy
— Brajesh Rajput (@drbrajeshrajput) October 13, 2024
प्राप्त माहितीनुसार, हा व्यक्ती जमिनीवर पडल्याचे पाहून लोकांनी त्याला उचलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर तेथे कर्तव्यावर असलेले एसीपी अजय तिवारी यांनी त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर दिला. त्यामुळे या व्यक्तीचे प्राण वाचले. पोलिस कर्मचाऱ्याने सीपीआर देताच काही वेळाने तो लगेच उभा राहिला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र पोलीस कर्मचाऱ्याच्या या कार्याचे होत आहे.