Mumbai Police Constable Viral Video (PC - Twitter)

Mumbai Police Constable Viral Video: मुंबई पोलिस कॉन्स्टेबलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हा कॉन्स्टेबल बासरी (Flute) वाजवताना दिसत आहे. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या जवानाने बॉर्डर चित्रपटातील 'संदेशे आते हैं...' (Sandese Aate Hai) या सुप्रसिद्ध गाण्याच्या सुरावर बासरी वाजवली आहे. यावेळी त्याचे इतर पोलिस साथीदारही तेथे उपस्थित होते.

हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अनेक युजर्सने हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. यामध्ये एक पोलीस 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेशे आते हैं...' हे गाणे बासरीच्या सुरात वाजवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव समजू शकले नाही. मात्र या कर्मचाऱ्याने बासरीवर वाजवलेली धून लोकांच्या चांगलीचं पसंतीस पडली आहे. (हेही वाचा - Woman Dance At Railway Station: गोविंदाचे गाणे लागल्यावर रेल्वे स्टेशनवर नाचू लागली महिला; ट्रेनमधून खाली उतरून बघू लागले लोक, Watch Video)

व्हायरल व्हिडिओ पहा -

वडाळाफोरम नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. पोस्टमध्ये लिहिलेल्या कॅप्शननुसार, हा व्हिडिओ मुंबईतील वडाळा येथील रफी अहमद किडवाई मार्गावर रेकॉर्ड करण्यात आला आहे.