Woman Dance At Railway Station: गोविंदाचे गाणे लागल्यावर रेल्वे स्टेशनवर नाचू लागली महिला; ट्रेनमधून खाली उतरून बघू लागले लोक, Watch Video
या व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोविंदाच्या गाण्यावर महिला कलाकार जबरदस्त डान्स करते.
Woman Dance At Railway Station: आजकाल सोशल मीडिया हे मनोरंजक आणि मजेदार व्हिडिओंचे भांडार बनले आहे. सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला रेल्वे स्टेशनवर डान्स (Woman Dance on Railway Station) करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गोविंदाच्या गाण्यावर महिला कलाकार जबरदस्त डान्स करते.
महिलेचा डान्स इतका जबरदस्त आहे की, लोक ट्रेनमधून खाली उतरून तिचा डान्स बघू लागतात. या प्रकरणामध्ये अनेकांची ट्रेन चुकल्याचेही सांगितले जात आहे. गोविंदाच्या गाण्यांवर ती महिला खूप छान नाचते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. इतकंच नाही तर जवळून पाहिलं तर मागे उभी असलेली मुलंही महिलेच्या डान्स स्टेप्सची कॉपी करताना दिसत आहेत. इंटरनेट यूजर्सना महिलेची ही मस्त स्टाइल खूप आवडली आहे. (हेही वाचा - Sammi Sammi Song Viral Video: 'सामी-सामी' गाण्याच्या तालावर महिला नाचली, भलतीच व्हायरल झाली; पाहा व्हिडिओ)
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल साडी नेसलेली एक महिला रेल्वे स्टेशनवर अभिनेता गोविंदाच्या 'आपके आ जाने से' गाण्यावर नाचू लागते. यावेळी महिला डोक्यावर पल्लू ठेवताना दिसत आहे. तुम्ही बघू शकता की, कधी ती गोविंदाच्या डान्स स्टेप्स फॉलो करते तर कधी गिटार स्टेप्स करते. महिलेचा डान्स इतका मजेशीर आहे की, लोक ट्रेनमधून उतरून महिलेचा डान्स बघू लागतात.
व्हिडिओ पहा -
View this post on Instagram
याशिवाय स्टेशनवर उभे असलेले अनेक लोकही महिलेच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. @mehnanitu नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओची सर्वात खास गोष्ट म्हणजे ती महिला कोणतीही लाज न बाळगता तिच्या डान्सचा पूर्ण मजा घेत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. प्रापंचिकपणा विसरून आपल्या आयुष्याचा आनंद लुटण्याचा एक प्रकारचा संदेश ही महिला आपल्या नृत्यातून देताना दिसत आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 07, 2022 07:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

