Rolls Royce अंगावर कोसळून मेकॅनिकचा मृत्यू, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल (Video)
Rolls Royce Garage Accident (Photo Credits: You Tube)

चीन येथील शांघाय (Shanghai) शहरात एका मेकॅनिकचा अंगावर Rolls Royce ही लक्झरी कार कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका गॅरेजमध्ये झालेल्या अपघाताचा व्हीडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे. मृत्यू पावलेल्या मेकॅनिकचं नाव Mr Liu असं आहे. गॅरेजमध्ये मागच्या बाजूला कार सरकून कोसळल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Mr Liu आणि Mr Yu हे दोघं गॅरेजमध्ये गाडी खालच्या बाजूवर काही काम करत होते. अचानक कारचा भाग मागाच्या बाजूला अधिक झुकल्याने गाडी खाली कोसळली. दोन मॅकॅनिकपैकी Mr Yu मागच्या बाजूला धावला. त्याचा एक पाय टायरखाली आला. मात्र Mr Liu याच्या अंगावर गाडी कोसळली. या अपघातानंतर तात्काळ त्याला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं स्थानिक मीडीया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. Mr Yu बचावला असला तरीही त्याच्या मांडीच्या हाडाचं नुकसान झालं आहे.