Army is... वर या शहीदाच्या मुलीने दिलेलं उत्तर ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल, पहा हा Viral Video
Naina Girish (Photo Credits: Twitter)

मेजर अक्षय गिरीश कुमार  (Major Akshay Girish) यांचं 30 नोव्हेंबर 2016 दिवशी जम्मू काश्मिरमध्ये नागरोटामध्ये शहीद झाले. पोलिस युनिफॉर्ममध्ये येऊन काही आतंकवाद्यांनी आर्मी युनिटवर हल्ला केला. मेजर अक्षय हे 51 इंजिनियर रेजिमेंटमध्ये ऑफिसर होते. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता आणि मुलगी नैना यांचा आयुष्य बदललं. पण नुकताच शेअर करण्यात आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमधून शहीद यांच्या मुलीच्या रूपात त्यांचे विचार अजूनही जीवंत असल्याची प्रचिती येते.

चिमुरड्या नैनाने तिच्या भाषेत 'आर्मी म्हणजे काय..? हे सांगितलं आहे. आर्मीची अशी व्याख्या आपल्या वडिलांनी सांगितल्याची आठवणही नैनाने शेअर केली आहे. देशभक्तीचा वसा पुढच्या पिढीकडे देऊन गेलेल्या शहीद अक्षय कुमार आणि त्यांची लेक नैना यांचा तुम्हांलाही अभिमान वाटेल. अक्षय यांचे वडील विंग कमांडर होते तर आजोबा आर्मीमध्ये कर्नल होते.

Twitter Reaction on Naina's Video (Photo Credits: Twitter)

अक्षयची आई मेघना गिरीश यांनी नैनाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये शेअर केला आहे. यामध्ये आर्मी आपल्याला प्रेम करायला शिकवते, समाजातील दुर्जनांसोबत लढते, जय हिंद म्हणायला भाग पाडते असं म्हणाली. सोशल मीडीयावरही या व्हिडिओचं, नैनाचं कौतुक केलं जात आहे.