Fact Check: CBSE दहावीच्या Social Science परीक्षेचा अभ्यासक्रम कमी झाला आहे? इंटरनेटवर व्हायरल झालेल्या वृत्तामागील सत्य जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Facebook)

Fact Check: सोशल मीडियावर खोट्या बातम्या मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. ज्यामुळे लोक अफवांना बळी पडत आहेत. दरम्यान, आणखी एक बनावट बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या सामाजिक विज्ञान (Social Science) परीक्षेचा अभ्यासक्रम आणखी कमी केला आहे.

या वृत्तासंदर्भात पीआयबीने सांगितले की 'सीबीएसईने दहावीच्या सामाजिक विज्ञान परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणखी कपात करण्याची घोषणा केलेली नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेली ही बातमी बनावट आहे, याचा सत्याशी काही संबंध नाही. याची पुष्टी देत ​​पीआयबीने ट्विट केले आहे की, "सीबीएसईने दहावीच्या सामाजिक विज्ञान परीक्षेच्या अभ्यासक्रमात आणखी कपात करण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही." हा दावा पूर्णपणे बनावट आहे. (वाचा - Fact Check: कोरोना व्हायरसच्या लसीसाठी 500 रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टमागील सत्यता)

दहावीच्या सामाजिक विज्ञान मंडळाची परीक्षा 27 मे 2021 रोजी होणार आहे. त्याच बरोबर, मंडळाने यापूर्वीचं 9 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमासाठी 30 टक्के घट केली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल बातमीची सत्यता तपासल्याशिवाय अनेकजण ती बातमी पुढे फॉर्वड करतात. नागरिकांनी अशा बनावट बातम्या पुढे पाठवू नये, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. कोणत्याही बातमीची सत्यता तपासण्यासाठी, लिंक केलेल्या वेबसाइटवर किंवा पीआयबीने जारी केलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.