Winter solstice 2018 Google Doodle: आजपासून उत्तरायणाला सुरूवात, वर्षातली सर्वात मोठी रात्र आज!
Winter Solstice 2018 Google Doodle (Photo Credits: Google Homepage)

Winter solstice 2018 Google Doodle:  21 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र म्हणून ओळखली जाते. आजपासून उत्तरायणाला सुरूवात होते. त्यामुळेच गूगल डूडलवरही याच दिवसाचं महत्त्व ओळखून Winter Solstice हे गूगल डुडलच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. यंदाचा दिवस खास असण्यामागील एक विशेष कारण म्हणजे वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी पूर्ण चंद्राची ( (Cold Moon) रात्र असेल.

प्रसिद्ध खगोल अभ्यासक , पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवस सर्वात लहान 10 तास 57 मिनिटांचे असून रात्र सर्वात मोठी म्हणजे 13 तास 3  मिनिटांची असणार आहे तसेच उद्यांपासून दिनमान वाढत जाणार आहे. 21 डिसेंबरच्या उत्तर रात्री 3 वाजून 52 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार असून त्यानंतर उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.

दर वर्षी 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिवस आणि रात्र समान असते. 21 जून दिवशी दिवस मोठा असतो. ( 13 तास 14 मिनिटे ) आणि रात्र सर्वात लहान ( 10 तास 46 मिनिटांची ) असते.