Ghosts of Gettysburg:  गेटिसबर्गचे भूत पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल, घ्या जाणून या शहराची कहाणी
Ghost of Gettysburg | (Photo Credits: Video grab)

Ghosts of Gettysburg Caught on Camera: जामध्ये भूत, पिशाच्च वैगेरे असा काही प्रकार नाही हे विज्ञानाने अनेकदा सिद्ध केले आहे. तरीसुद्धा भूत असल्याच्या आणि ते दिसल्याच्या बातम्या वारंवार येत राहतात. आता तर लोकांच्या हाता कॅमेरा आल्यापासून भूतांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचेही पाहायला मिळते. पेनसिल्वेनिया (Pennsylvania) मध्ये असलेल्या गेटिसबर्ग (Gettysburg) येथून असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात भूत पाहिल्याचा दावा करण्यात येतो आहे.

सांगितले जात आहे की, सिविल वॉर साइट (Civil War site) जवळ एक कुटुंब आपल्या कारने निघाले होते. तेवढ्यात त्यांना अंधारात भूतांच्या सावल्या पाहायला मिळाल्या. भूतांच्या सावल्या आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास हा परिवार यशस्वी झाला. आता इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा, झाडावर पाहिले तरुणीचे भूत ; गावकऱ्यांची उडाली झोप)

दरम्यान, ग्रेग युलिंग (Greg Yeulling)आणि त्यांचा परिवार या ऐतिहासिक युद्ध स्थळाजवळ (Historic Battleground) फिरत होते. या ठिकाणी गृहयुद्धादरम्यन, 50 हजारांहूनही अधिक सैनिक मारले गेले होते. या व्हिडिओत दोन आत्मा (Two Apparitions) सारख्या सावल्या तोफांच्या चारीबाजूंनी फिरताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेटिसबर्ग येथील लढाई 1 जुलै 1863 मध्ये लढली गेली. अमेरिकेच्या गृहयुद्धात ही लढाई यूनियन आणि कन्फेडरेट जनरल रॉबर्ट ली या सैन्यात झाली. या विनाशकारी युदधात मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. सांगितले जाते की या सैन्यात 50 हजार इतके सैनिक मारले गेले होते. या युद्ध ठिकाणानंतर या ठिकाणी भूतांच्या सावल्या अथवा अस्तित्व पाहिल्याचा दावा अनेकांनी केला. त्याबाबत अनेकदा वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.