Genelia Deshmukh चा तिचे लेक रियान आणि राहिल सोबतचा सुशांत सिंह राजपूत च्या गाण्यावरील व्हिडिओ पाहून तुमचाही विकेंड जाईल मजेशीर, Watch Video
Genelia Deshmukh with Riaan and Rahyl (Photo Credits: Instagram)

रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) सोशल मिडियावर बरेच चर्चेत असतात. हे दोघेही सोशल मिडियावर सक्रिय असल्याने चाहतेही त्यांच्याही यामाध्यमातून संवाद साधत असतात. या दोघांचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होण्याचे कारणच तेच आहे. जेनेलियाने नुकताच आपल्या लेकांसोबत रियान (Riaan) आणि राहिलसह (Rahyl) केलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून ती आपले मातृत्व किती एन्जॉय करतेय हे या व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओखाली जेनेलियाने आपला आई बनण्याचा अनुभव शेअर करत तमाम मातांना छान संदेश दिला आहे.

या व्हिडिओ मध्ये जेनेलियाच्या बाजूला रियान आणि राहिल आहेत आणि हे तिघे सुशांत सिंह राजपूतच्या 'मैं तेरा बॉयफ्रेंड' या गाण्यावर क्युट मूव्ह्स देताना दिसत आहे.हेदेखील वाचा- जेनेलिया देशमुख ने शेअर केला तिचे लेक रियान आणि राहिल सोबत निसर्गाच्या सान्निध्यात आयुष्य जगण्याचा नवा अनुभव, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या पोस्टखाली जेनेलियाने म्हटले, "आई झाल्याची जाणीव तेव्हा होते जेव्हा आपण आपल्या मुलांना सर्वात जास्त महत्त्वाचे समजतो. कालांतराने आपल्याला जाणवते की त्यांच्यासाठी आपणच सर्वकाही असतो. आपली मुलं खूप क्षमाशील असतात. आपली आई आपल्या सतत जवळ असावी असे त्यांना वाटत असते. आपली आई नेहमीच योग्य असते असे त्यांना वाटते. मी कदाचित चांगली आई नसेल. माझ्याकडून चुका झाल्या असतील. मात्र माझ्या मुलांचा विषय येतो तेव्हा त्यांना माझ्यापेक्षा कोणी जास्त चांगले मिळू शकत नाही याची जाणीव होते. त्यामुळे जगातील सर्वच माता खूपच उत्कृष्ट आहेत हेच मी सांगेन. त्यामुळे तुमच्या बद्दल कोण काय विचार करतं याचा विचार तुम्ही करु नका."

जेनेलिया, रितेश आपल्या कुटूंबियांसोबत अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर करत असतात. या सर्व व्हिडिओज त्यांचे चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.