Farmer Viral Video: कष्टाचं फळ मिळालं, गायीचं शेण विकलं आणि शेतकऱ्याने बांधला 1 कोटीचा बंगला (Watch Video)
farmer- Photo credit- instagram

Farmer Viral Video: चिकाटी, जिद्द असली की आपलं स्वप्न पुर्ण करता येते. कित्येत मराठी माणसांने मुठभर पैशांने करोडो रुपयांचा उद्योग उभा केला आहे. सद्या सोशल मीडियावर एका शेतकरांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ह्या शेतकरांनं चक्क गायीच्या शेणापासून 1 करोड रुपयांचा बंगला बांधला आहे. शेतकऱ्याने केलेल्या ह्या कामाचं कौतुक सर्वत्र होत आहे. गायीच्या शेणाचा वापर करत त्याने  गावी 1 करोड रुपयांचा बंगला बांधला आहे. त्या बंगल्याचे नाव गोधन निवास असे ठेवण्यात आले आहे. एक छोट्याश्या कल्पनेतून या शेतकऱ्याने आपलं स्वप्न साकारलं.

सांगोली तालुक्यातील इमडेवाडीत राहणारे शेतकरी प्रकाश नेमाडे यांच्या कतृत्ववान गोष्टीची चर्चा सर्वीकडे होत आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 4 एकर जमिन होती. पण पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना या जमिनीत शेती करणं काही शक्य होत नव्हतं. त्यानंतर त्यांनी गायीचं दूध विकण्याचं व्यवसाय सुरु केला सुरुवातील त्याच्याकडे  1 गाय होती. गावोगावी जावून दूध विकण्याचं काम केलं ह्या व्यवसायातून ते थोडे पुढे आले. आता तब्बल 150 गायी त्यांच्या कडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या विचारांनी ते हळूहळू पुढे आले. त्यांनी दुधासोबत त्यांनी गायीचं शेण सुद्दा विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

शेतीमध्ये आता रासायनिक खतांऐवजी लोक सेंद्रिय खतांचा वापर करू लागले आहेत. शिवाय गोबर गॅस प्लांट सुद्धा आहेतच. या नव्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर शेणाची गरज भासते. अन् ही गरज प्रकाश नेमाडे पूर्ण करतात. शेण विकत त्यांनी नवीन व्यवसाय सुरु केला. 4  एकर कोरडवाहू शेतजमिन होती. त्यांच जमीनीवर कोट्यावधींचा व्यवसाय सुरु केला. ह्या शेतकऱ्यांची कमाल तरुणांना प्रेरित करणारी आहे.