Elephant (Photo Credits: Twitter)

फणसाचे रसाळ गरे बघून माणसालाचं का हत्तीला (Elephant) देखील राहावल्या जात नाही, हे या व्हिडिओ मधून बघायला मिळत.  एका उच्च झाडावर फणसं (Jackfruit) लागलेले आहेत आणि ते फणसं बघून हत्तीच्या देखील तोंडाला पाणी सुटलं आणि गजराजाने आपला थेट मोर्चा फणसाच्या झाडाकडे वळवला आणि सुरु केली ते फणस तोडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. खुप प्रयत्न केल्या नंतर पण फणस काही हत्तीच्या सोडेंत येईना. पण फणस सोडून परत जाणे हत्तीला शक्य होईना. फणस तोडण्यासाठी हत्ती थेट माकड (Monkey) उड्या मारताना दिसला. अखेर प्रयत्ना अंती परमेश्वर आणि हत्तीने फणस तोडलंचं. तरी गजराजाचा हा फणस तोडतानाचा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मिडीयावर (social Media) भन्नाट व्हायरल (Viral) होताना दिसत आहे.

 

हत्तीचा हा फणस तोडतानाचा व्हिडीओ IAS सुप्रिया साहू (Supriya Sahu) यांनी त्याच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर (Twitter Account) शेअर केला आहे. सुप्रिया साहू या तमिळनाडू सरकारमध्ये (Tamil Nadu Government) पर्यावरण विभागात चिफ सेक्रेटरी (Addl Chief Secretary Environment Climate Change & Forests) म्हणून कार्यरत आहेत तर त्या बहूचर्चीत टेलिव्हीजन शो (television Show) कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) यात देखील स्पर्धक म्हणून आलेल्या आहेत. पर्यावरण आणि जंगल विभागात कार्यरत असणाऱ्या सुप्रिया साहू कायमच त्याच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून जंगली प्राण्यांच्या विविध गमतीजमती शेअर करताना दिसतात.

 

गजराजाचा व्हायरल होणार हा व्हिडीओ तमिळनाडूतील असुन तिथील गावकऱ्यांनी तो शुट केला आहे. तसेच या व्हिडीओवर आतापर्यत हजारो लाइक्स(Likes) आले असुन यावर शेकडो कमेंट्सचा (comments) पाऊस पडताना दिसत आहे.  व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओला नेटकरी मोठी पसंती दर्शवत आहेत.