सावधान! पिझ्झामध्ये आढळले Cockroach , झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर Domino's Pizza Outlet ला ठोकले टाळे
Pizza

Cockroach in Food:- पिझ्झा प्रेमींनो सावधगिरी बाळगा, तुम्ही शिळे अन्न खाणार का? नक्कीच, नाही! परंतु जर तुमच्या अन्नात झुरळ आढळले तर तुम्ही तात्काळ ते अन्न खाणे थांबवाल. दरम्यान, सिडनीच्या लोकप्रिय पिझ्झा आउटलेटमध्ये दिलेल्या पिझ्झा मध्ये फक्त चिली फ्लेक्स आणि पेपी सॉसच नव्हे तर झुरळ देखील आढळले. आंतरराष्ट्रीय मीडियाने वृत्त दिले आहे की, सिडनीमधील डोमिनोज पिझ्झा आउटलेटने तयार केलेल्या अन्नात झुरळ आढळल्याने, अन्न तपासणी पथकाने सिडनीमधील डोमिनोज पिझ्झा आउटलेट बंद केले. एका ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पिझ्झामध्ये झुरळ मिळाल्याचा दावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सिडनीमधील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट गलिच्छ अन्न तयार करण्याचे ठिकाण आणि झुरळांचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर सिडनीमधील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट टाळे ठोकण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर खातांनाही सावधानी बाळगा.[ हे देखील वाचा :- अबब! Condom झाले TV पेक्षा महाग, एका पॅकेटची किंमत तब्बल 60,000 रुपये, जाणून घ्या कुठे]

बाहेर जेवण करायला बहुतेकांना आवडते, त्यामुळे अनेक जण बाहेर जेवण करणे पसंत करतात, परंतु सिडनी मध्ये घडलेल्या घटनेमुळे अधिक सावधानी बाळगण्याची गरज आहे, यापूर्वीही नावाजलेल्या आउटलेटमध्ये असे प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे बाहेरचे अन्न खाणे टाळा. घरचे सात्विक अन्न खाणे आरोग्यासाठी कधीही चांगले आहे.