Burger Ice Cream Rolls: चर्चेत असलेल्या बर्गर आईस्क्रीम रोलवर खाद्यप्रेमीच्या संतप्त प्रतिक्रीया; पाहा नेटकरी काय म्हणाले (Watch Video)
Photo Credit - Instagram

Burger Ice Cream Rolls: देशभरात सूर्य चांगलाच आग ओकत आहे. नागरिक उष्णतेच्या लाटेने संतप्त झाले आहेत. अनेकांची पावले थंडगार शित पेय, आईस्क्रिम (Ice Cream) अशा खाद्यपदार्थांच्या दुकानाकडे वळत आहेत. त्यातच खाद्यप्रेमींना अचंबीत करणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ "बर्गर आईस्क्रीम रोल्स" बनवतानाचा आहे. नावाप्रमाणे या आइस्क्रीम रोलमध्ये बर्गरचा (Burger) वापर केला आहे. या व्हिडीओवर अनेक खाद्यप्रेमींच्याही (Food Lover) प्रतिक्रीया आल्या आहेत. ज्यात काही खाद्यप्रेमी या बर्गर आईस्क्रीम रोल्सचा तिरस्कार करत आहेत. तर काहींनी त्या व्हिडीवर विनोदी प्रतिक्रीया दिल्या आहेत. (हेही वाचा: Viral Video: रील बनवण्यासाठी सिलिंडरवर चढून करत होती डान्स, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का)

हा व्हिडीओ फूड व्लॉगर पियुष सिंगने (@who_piyush98) इंस्टाग्रामवर शेअर केली होती. ज्यात व्हिडीओची सुरुवात एक आईस्क्रीम विक्रेता बर्गरवर दूध ओतताना होते. त्यानंतर तो सर्व गोष्टी एकत्र करत दुधात मिसळू लागतो. ज्यात दोन बन पाव, टोमॅटोचे दोन तुकडे,एक बर्गर पॅटी, कांदे आणि अंड्यातील बलक वापरून बर्गर तयार केलेला होता. या सर्व गोष्टी तो मॅश करतो नंतर एकजीव करतो.त्यानंतर तो सगळे मिश्रण पसरवतो. आणि त्यानंतर ते थंड झाल्यावर त्याचे रोल बनवतो आणि कपमध्ये व्हीप्ड क्रीम, टोमॅटोसोबत सर्व करतो.

बर्गर आइस्क्रीम रोलचा संपूर्ण व्हिडिओ पहा:

 

View this post on Instagram

 

A post shared by Piyush Singh (@who_piyush98)

इंटरनेटवर संतप्त प्रितीक्रीया-

या विचित्र खाद्य प्रयोगावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका खाद्यप्रेमीने लिहिले की, "जगभरात या विचित्र खाद्य प्रयोगााचा तिरस्कार होईल." तर "क्या कुछ भी... कुछ तो छोड दिया करो", अशी प्रतिक्रीया दुसऱ्या एकाने दिली. "किमान तू टोमॅटो काढायला हवा होता," अशी प्रतिक्रीया तिसऱ्याने दिली आहे. एका वापरकर्त्याने विनोद करत, "मी बर्गर आणि आईस्क्रीम ऑर्डर केली होती, बर्गर आईस्क्रीम नाही" अशी प्रतिक्रीया दिली.

दरम्यान, आईस्क्रीमवर प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक पदार्थांपासून आईस्क्रिम रोल तयार केले आहेत.