Rajasthan Shocker: कुत्रा घरात येतो म्हणून सर्जनने कुत्र्याला पाच किलोमीटरपर्यंत नेले फरफटत, डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल
Dog chained with car (photo credit- ANI)

Jodhpur, September 19:  राजस्थान येथील घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.राजस्थानच्या जोधपूरमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये जोधपूरमध्ये एका डॉक्‍टरने कुत्र्याला कारला बांधून पाच किलोमीटरपर्यंत फरफटत नेले ओढत घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. डॉक्‍टरच्‍या घरात तो कुत्रा घुसला होता, यामुळे रागात डॉक्‍टरने असे केले असल्याचे समोर आले आहे.  डॉ. रजनीश गालवा हे एसएन मेडिकल कॉलेजमध्ये असून ते प्लास्टिक सर्जन आहेत.

दरम्यान दुचाकीस्वारांनी कुत्र्याचा जीव वाचवला असुन डॉक्टरांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर रजनीश गालवा असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टर रजनीश गालवा यांनी त्यांच्या डॉक्टर सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले आणि तरुणांना जबर मारहाण केली. तरुणांनी मनेका गांधी यांना दिल्लीत या प्रकरणाची माहिती दिली होती. मनेका गांधी यांनी शास्त्रीनगर पोलीस स्टेशनच्या स्टेशन ऑफिसरला फोन केला आणि   डॉक्टर विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, कुत्र्यावर उपचार सुरु आहेत. 

पाहा व्हिडीओ : 

This is done by plastic surgeon doctor based in Jodhpur. The doctor dragged the helpless dog for five kms.

As usual #Jodhpur police didn’t heed much to dog rescue team but got busy in helping the accused doc. @We_Are_Jaipur @DHFJodhpur @ShoebKhanTOI pic.twitter.com/8NaYyCOwQx

— Kumar Manish (@kumarmanish9) September 18, 2022

माहिती मिळताच डॉग होम कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून कुत्र्याला उपचारासाठी पाठवले. त्यांनी डॉक्टरांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांना वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही लोकांनी केला. दरम्यान, अनेकदा कुत्रा घरात घुसून घराबाहेर भुंकत राहतो आणि त्यामुळे असे करण्यात आले