महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी अलीकडेच महिंद्राची नवीन इलेक्ट्रिक वाहने (Mahindra Cars) बीई 6 ई (Mahindra BE6e) आणि एक्सईव्ही 9 ई (Mahindra XEV 9e) लाँच केली. मात्र, या वाहनांचे कंपनीने केलेले डिझाइन (Mahindra Car Design), विश्वासार्हता आणि सेवेच्या गुणवत्तेवर तीव्र टीका झाली. ही टीका सोशल मीडियावर असल्याने कंपनीच्या वतीने स्वत: आनंद महिंद्रा यांनीच त्यास प्रत्युत्तर दिले. त्यामुळे टीकाकार आणि समूहाचे अध्यक्ष यांच्यात झालेला संवाद सार्वजनिक पटलावर उपलब्ध झाला. टीकाकार आणि महिंद्रा यांच्यातील संवाद आता सोशल मीडियावर चांगला चर्चेचा विषय ठरला आहे.
एक्स वापरकर्त्याकडून तीव्र शब्दांत टीका
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील एका वापरकर्त्याने महिंद्रा वाहनांवर टीका केली आणि दावा केला की, ह्युंदाईसारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे सौंदर्यात्मकता,आकर्षण आणि विश्वासार्हता नाही. आता हटवण्यात आलेल्या पोस्टमध्ये काही डिझाईन्सचे वर्णन 'गोबर (शेण) किंडा' असे करण्यात आले. तसेच, खरेदी करण्यापूर्वी योग्य संशोधन करणाऱ्यांसाठी महिंद्रा कार कमी दर्जाच्या असल्याचा आरोपही टीकाकाराने केला होता. ज्याला आनंद महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिले. (हेही वाचा, Anand Mahindra Shares Mosquito-Killing Device: डास मारण्याची ही तोफ कोठे शोधायची? आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया शेअर केले खास उपकरण)
आनंद महिंद्रा यांची संयमी प्रतिक्रिया
दरम्यान, एक्स वापरकर्त्याने तीव्र शब्दांत केलेल्या टीकला आनंद महिंद्रा यांनी अत्यंत संयमी भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यांनी ही टीका सकारात्मक घेत प्रतिसाद देताना म्हटले की, आपली सूचना ही कंपनीच्या प्रवासावर चिंतन करण्याची संधी म्हणून आम्ही पाहतो. सधारण 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या वाढीवर प्रकाश टाकताना, जेव्हा जागतिक तज्ञांनी महिंद्राला कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला होता, तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिसादात पुढील प्रदीर्घ प्रवासाची कबुली दिली. त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तरादाखल दिलेल्या प्रतिसादात खालील मुद्द्यांचा समावेश आहे.
- "1991 मध्ये जेव्हा मी कंपनीत रुजू झालो, तेव्हा अर्थव्यवस्था नुकतीच खुली झाली होती. एका जागतिक सल्लागार संस्थेने आम्हाला कार व्यवसायातून बाहेर पडण्याचा जोरदार सल्ला दिला. त्यांच्या मते, प्रवेश करणाऱ्या परदेशी ब्रँडशी स्पर्धा करण्याची आम्हाला संधी नव्हती. तीन दशकांनंतर, आम्ही अजूनही जवळपास आहोत आणि तीव्र स्पर्धा करीत आहोत.
- अततायीपणाचा आरोप, संशयवाद आणि अगदी कठोर टीका यामुळेही कंपनीच्या यशाची भूक वाढली. समूहाला उच्च लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रेरित केल्याबद्दल टीकाकारांचे आभार.
- आम्ही केलेल्या कार्यामध्ये "आत्मसंतुष्टतेसाठी जागा नाही". (हेही वाचा, Anand Mahindra यांनी विठूभक्तीमध्ये शेअर केली X वर खास पोस्ट!)
महिंद्रा यांचे दीर्घ उत्तर
You’re right, Sushant.
We have a long way to go.
But please consider how far we have come.
When I joined the company in 1991, the economy had just been opened up.
A global consulting firm strongly advised us to exit the car business since we had no chance, in their view, of… pic.twitter.com/xinxlBcGuV
— anand mahindra (@anandmahindra) December 1, 2024
टीकाकाराने हटवली पोस्ट
दरम्यान, महिंद्रा यांच्या संयमी प्रतिसादावर आश्चर्य व्यक्त करत समीक्षकाने नंतर आपली पोस्ट हटवली. स्पष्टीकरणादरम्यान त्याने सांगितले की, महिंद्रा टीमचा कॉल आल्यानंतर आपण पोस्ट हटवली, असे सांगितले.
टीकाकाराकडून स्पष्टीकरण
OMG this is so sweet.
I am glad you took the criticism constructively, I had to delete the tweet after a call from yiur team because I thought they are unhappy with the harsh words.
— Sushant Mehta (@SkyBarrister) December 1, 2024
महिंद्राच्या एक्सईव्ही 9ई या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लाँचिंग दरम्यानच ही टीका आणि संवाद झाला. जो व्हायरल होत आहे. नव्याएसयूव्हीची किंमत (ex-showroom) 21.90 लाख रुपये आहे. महिंद्राच्या INGLO प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेल्या XEV 9e ची डिलिव्हरी फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होईल, असे कंपनीने म्हटले आहे.