Telangana: सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोबिता शिवन्ना (Shobhitha Shivanna) हिने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. 30 नोव्हेंबरच्या रात्री 30 वर्षीय शोबिता तिच्या हैदराबाद येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली. शोबिता हिच्या निधनामुळे संपूर्ण कन्नड चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोबिताचे लग्न झाले होते. शोबिता हिने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी शोबिताचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
Rangareddy, Telangana: Kannada actress Shobhitha Shivanna found dead in apartment. She allegedly committed suicide by hanging herself at her residence in Kondapur, within the limits of PS Gachibowli. The police have registered a case and the deceased's body has been shifted to…
— ANI (@ANI) December 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)