Republic Day 2021: 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवून मुस्लिम व्यक्तीने जिंकली सर्वांची मनं; पहा व्हायरल व्हिडिओ
Viral Video (Photo Credits: Twitter)

Republic Day 2021: प्रजासत्ताक दिन (Republic Day) हा असा एक राष्ट्रीय सण आहे, जो दरवर्षी 26 जानेवारीला मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1950 मध्ये भारत सरकार अधिनियम (1935) काढून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली. वस्तुतः 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिन हा एक सण आहे जो प्रत्येक धर्म, प्रत्येक जाती आणि भारतात राहणारा प्रत्येक समुदाय मोठ्या थाटामाटात साजरा करतो. या दिवशी सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज (National Flag) फडकविला जातो आणि तिरंग्याला सलामी दिली जाते. या दिवशी देशभक्तीपर गीते गायली जातात आणि भारत मातेचे गुणगाण गायले जातात.

दरम्यान, 72 व्या प्रजासत्ताक दिनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुस्लिम व्यक्ती 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' धून वाजवत आहे. हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला नेटीझन्सनी लाईक्स तसेच कमेन्ट्स दिल्या आहेत. तसेच हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' असं कॅप्शन दिलं आहे. (वाचा -Tractor Accident During Farmer's Rally: रॅलीदरम्यान स्टंट करताना ट्रॅक्टर उलटला, चिल्ला बॉर्डर येथील घटना; पाहा व्हिडिओ)

प्रजासत्ताक दिनी शेअर केलेल्या या व्हिडिओला 3.3K व्यूज मिळाले आहेत. तसेच काही तासातचं या व्हिडिओला 542 लाइक्स आणि 69 रीट्वीट्स मिळाले आहेत. सुमारे 18 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक मुस्लिम व्यक्ती बसलेला दिसत आहे. ही व्यक्ती 'सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा' या गाण्याची धून वाजवत आहे. या सूराने लोकांची मने जिंकली आहेत.