Viral Video: निंदनीय! संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये मद्यधुंद रेल्वे कर्मचाऱ्याने केली लघवी, सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch
Railway Employee Urinated in AC Coach (PC - Twitter/@fpjindia)

Railway Employee Urinated in AC Coach: संपर्क क्रांती एक्स्प्रेस (Sampark Kranti Express) च्या थर्ड एसी कोच (AC Coach) मध्ये एका मद्यधुंद रेल्वे कर्मचाऱ्याने (Railway Employee) लघवी केल्याचे अत्यंत निंदनीय कृत्य समोर आलं आहे. या कृत्यामुळे प्रवाशांना राग अनावर झाला आहे. संतापलेल्या प्रवाशांनी या कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वेने त्याच्या निलंबनाचे आदेश दिले.

दशरथ कुमार, असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, तो जबलपूर रेल्वे विभागाच्या मेकॅनिकल विभागात ओएस म्हणून तैनात आहे. दिल्लीत नियोजित नवीन पेन्शन योजनेसाठी देशव्यापी आंदोलनात सामील होण्यासाठी संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या B6 डब्यात चढताना 9 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नंतर तो ट्रेनमध्ये दारूच्या नशेत आला आणि गैरवर्तन करू लागला. व्हिडिओमध्ये पुढे तो कोचमध्ये सार्वजनिकपणे लघवी करताना दिसत आहे. (हेही वाचा -Shocking! YouTube ट्यूटोरियल पाहून पतीने घरीचं केली पत्नीची प्रसूती; महिलेसह बाळाचा मृत्यू)

दशरथ नंतर ट्रेनमध्येच बेशुद्ध पडला. ही बाब रेल्वेच्या निदर्शनास येताच त्यांनी दशरथला तत्काळ निलंबित केले. गेल्या महिन्यात, सिधी लघवी प्रकरणाने राज्य हादरले होते ज्यात भाजप नेत्याने सिधी जिल्ह्यात एका आदिवासी माणसाच्या चेहऱ्यावर लघवी केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांकडून त्यावर जोरदार टीका झाली होती.