Doctor Dies While Deboarding Train: रविवारी (5 नोव्हेंबर) आग्रा (Agra) येथील राजा की मंडी रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना चालत्या रेल्वेखाली (Deboarding Train) पडून एका व्यक्तीचा वेदनादायक मृत्यू झाला. ट्रेन अंगावर गेल्याने त्या व्यक्तीचे शरीर दोन तुकडे झाले. ही धक्कादायक आणि दु:खद घटना स्थानकाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रेल्वेखाली येऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव डॉ. लखन सिंग गालव असे आहे. ते आग्रा येथील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन होते. ते आपल्या मुलीला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले होते. ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना ते रेल्वेच्या रुळावर पडले. या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. (हेही वाचा -Faithful Dog Video: मालकाचा मृत्यू, कुत्रा मात्र चार महिन्यांपासून शवागराबाहेर पाहतोय वाट; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल)
UP : आगरा के डॉक्टर लाखन सिंह की ट्रेन हादसे में मौत हो गई। वे बेटी को बैठाकर चलती ट्रेन से उतर रहे थे। बैलेंस गड़बड़ाया और ट्रेन के नीचे आ गए। सिर धड़ से अलग हो गया।
पैसेंजर को ट्रेन में सीट तक बैठाने, आराम से वापस उतरने की ये 'परंपरा' अक्सर पेरेंट्स की जान ले लेती है। pic.twitter.com/y8RC24FLqB
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 5, 2023
काही वेळातच या दुर्दैवी अपघातात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी सोशल मीडियावर डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली आहे.