Drink Alcohol On Moving Car (PC - X/@lokmattimeseng)

Drink Alcohol On Moving Car: चेन्नई (Chennai) मध्ये एका जोडप्याने आपल्या कारचे सनरूफ (Sunroof) उघडून दारू पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या जोडप्याला जीएसटी रोडवर कारचे सनरूफ उघडून दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी अटक केली आहे. संजय (वय, 23) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पेरुंगुडी येथील रहिवासी आहे. संजय हा एका खाजगी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, तो त्याची गर्लफ्रेंड वीणासोबत गजबजलेल्या तांबरम पल्लवरम जीएसटी रोडवरून प्रवास करत होता. संजय आणि त्याची गर्लंफ्रेड कारचे सनरूफ उघडून बाहेर आले. यावेळी त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या दिसत होत्या. त्याच्या अटकेच्या दोन दिवस आधी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (हेही वाचा - Noida: हातात दारूची बाटली घेऊन एक तरुण गाडीच्या छतावर करत होता डान्स, पोलिसांनी कारवाई करत गाडी केली जप्त)

पोलिसांनी कारचा नोंदणी क्रमांक शोधून काढत संजयचा शोध घेतला. व्हिडिओमध्ये हे कपल्स सनरूप उघडून पार्टी करत असताना दिसत असून कोणीतरी गाडी चालवत असल्याचे दिसत आहे. (Viral Video: एसटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करताना प्रवाशांचा स्टंट फेल, जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

पहा व्हिडिओ - 

थोराईपक्कम पोलिसांनी विद्यार्थ्याविरुद्ध सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, त्याची कारही जप्त करण्यात आली आहे.