Barber Massages Man's Face With Spit: लखनऊमध्ये थुंकिने ग्राहकाच्या चेहऱ्यावर मसाज करत होता नाई; आरोपीला अटक
Massages, Arrest प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Barber Massages Man's Face With Spit: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील लखनऊ (Lucknow) येथून एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. येथील एका सलूनमध्ये ग्राहकाच्या चेहऱ्यावर स्वत:च्या थुंकीने मसाज करताना कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर एका नाईला (Barber) अटक (Arrest) करण्यात आली आहे. सलूनमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी झैद हा त्याच्या हातावर थुंकून ग्राहकाच्या तोंडाची मसाज करताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याच्या या कृत्यामुळे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, ग्राहकाला झैदच्या कृत्याचा संशय आला. त्यानंतर ग्राहकाने सलूनमध्ये बसवलेले सीसीटीव्ही तपासले. नाईला हातावर थुंकताना आणि थुंकीचा वापर करून चेहऱ्याला मालिश करताना पाहून त्याला धक्का बसला. यानंतर त्याने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. (हेही वाचा -Viral Video: पार्टीत फटाक्यांमुळे जखमी झालेल्या पत्नीला पतीने सावरले, पण रडणाऱ्या बाळाकडे केले दुर्लक्ष; इंटरनेट संताप व्यक्त)

पहा व्हिडिओ -

त्यानंतर ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे लखनऊ पोलिसांनी झैदला अटक केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स सलून मालकावर टीका करत आहेत. तसेच काही लोक अशा कृत्यांना अश्लील आणि घृणास्पद म्हणत आहेत. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. सोशल मीडियावर लोकांनी सलून मालकावर कडक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.