Red Wine Floods (Photo Credit - Twitter)

Red Wine Floods: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्स (Netizens) हैराण झाले आहेत. विषेशत: जे मद्यप्रेमी आहेत, ते तर हा व्हिडिओ पाहून अवाक झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये 50 हजार लीटर वाइन पाण्याप्रमाणे वाहून गेलेली पाहायला मिळत आहे. (50,000 Litres of Wine Floods Spanish Winery)  त्यामुळे हा व्हिडिओ पाहून मद्यप्रेमींना नक्कीच दुःख वाटत असणार. प्राप्त माहितीनुसार, हा व्हायरल व्हिडिओ स्पेनमधील आहे. या व्हिडिओमध्ये 10, 20 लीटर नव्हे तर, चक्क 50 हजार लीटर वाइन पाण्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहे.

एका वाइन फॅक्ट्रीमधील कंटेनर फुटल्याने हजारो लीटर वाइन वाया गेली असून रस्त्यावर अक्षरशा रेड वाइनचा पूर आला आहे. Radio Albacete या ट्विटर यूजर्सने आपल्या अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. (हेही वाचा -Youngest Person To Do Water Skiing: काय सांगता? 6 महिन्यांच्या बाळाने केले वॉटर स्कीइंग; बनवला विश्वविक्रम (Watch Video))

याशिवाय अनेकांनी आपल्या ओळखीच्या तळीरामांना हा व्हिडिओ टॅग केला आहे. हा व्हिडिओ पाहून या सर्व तळीरामांना मोठं दु:ख सहन करावं लागलं आहे. 49 सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यातील अनेकांनी रस्त्यावर वाहत असलेल्या वाइनचं दु:ख व्यक्त केलं आहे.