डीजे (DJ) वर थिरकायला कोणाला नाही आवडत. तुम्हीही अनेकदा डीजेच्या बीट्सवर जोरदार डान्स केला असेल आणि डीजे प्लेअरचे कौतुकही केले असेल. परंतु, आज आपण अशा एका डीजेला भेटणार आहोत. ज्याने अगदी लहान वयातच डीजे वाजवण्याची कला संपादन केली आहे. हा डीजे प्लेअर अवघ्या 3 वर्षांचा असून डीजे आर्च (DJ Arch) असे त्याचे नाव आहे. हा जगातील सर्वात लहान डीजे प्लेअर आहे. त्याचे हे टॅलेंट भल्याभल्यांना हैराण करणारे आहे. या चिमुकल्याचे कौशल्य पाहून अनेकजण अचंबित होतात. 3 वर्षांचं मुलाची कितपत समज असणार? असा सर्वसाधरण समज पुसून टाकणारे काम या छोट्या डीजेवीराने केली आहे.
डीजे आर्चने साऊथ आफ्रीका गॉट टॅलेंट मध्ये (South Africa's Got Talent) भाग घेतला होता. त्यात त्याचे कौशल्य पाहून सर्व परिक्षक आणि प्रेक्षक आवाक् झाले. या टॅलेंट शो मधील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत आर्च रेड जॅकेटमध्ये दिसत आहे. त्यात त्याने रेड हेडफोन्स लावले आहेत. विशेष म्हणजे त्याची डीजे वाजवण्याची पद्धत अगदी एखाद्या प्रोफेशनल सारखी आहे. त्यामुळे त्याचेही कौतुक होत आहे.
पहा व्हिडिओ:
सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओला युट्युबवर आतापर्यंत 21 कोटी 30 लाख 1 हजार 423 वेळा पाहिला गेला आहे. साऊथ आफ्रीका गॉट टॅलेंट च्या सहाव्या सीजनचा आर्च विजेता आहे. विशेष म्हणजे त्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याने आपली दोन गाणी रिलीज केली असून 'मॉन्स्टर', 'मेमरी' नावाचे दोन्ही ट्रॅक त्याच्या युट्युब चॅनलवर आहेत.