उस्मानाबाद: खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला, आरोपी फरार
Omraje Nimbalkar | File Photo

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. आज (16 ऑक्टोबर) कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी मतदारसंघामध्ये आज प्रचार सभेदरम्यान तरूणाने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला केल्याचं वृत्त  समोर आलं आहे.   सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर सारेच पक्ष कामाला लागले आहेत. ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेचे खासदार आहेत. ओमराजेंच्या पोटात चाकू भोकसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच ते सावध झाल्याने तो हातावर निभावला आहे. तसेच ओमराजे सुखरूप आहेत.

ओमराजेंवर हल्ला करून आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलिस तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद मध्ये ओमराजे ट्रीपल सीट बाईकवर बसून प्रचार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही वर्षांपूर्वी ओमराजे यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांचा खून झाला आहे. ते प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित आहे.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार असलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना मोठ्या फरकाने पराभव केला होता.