Yellow Line Mumbai Metro | X@rajtoday

मुंबईत बहुप्रतिक्षित Yellow Line Mumbai Metro 2B ने रविवारी (13 एप्रिल) एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चेंबूरमधील डायमंड गार्डन (Diamond Garden Chembur) आणि मानखुर्दमधील मांडले (Mandale) दरम्यानचा 5.4 किमीचा मार्ग आता लाईव्ह-चार्ज झाला आहे. या मार्गावर आता ओव्हरहेड इलेक्ट्रिकल वायर्स अ‍ॅक्टिव्ह झाल्या आहेत. दरम्यान ही लाईन अ‍ॅक्टिव्ह करण्याच्या प्रस्तावित वेळेच्या 4 वर्षांनंतर ही अपडेट समोर आली आहे.

'मिड-डे' च्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 एप्रिल रोजी ट्रायल रन सुरू होतील. ही तारीख खास असण्यामागील कारण म्हणजे याच दिवशी 172 वर्षांपूर्वी मुंबई मध्ये पहिली ट्रेन धावली होती. याच दिवशी भारतीय रेल्वेचा स्थापना दिन साजरा केला जातो.

घाटकोपर येथून सुरू होणाऱ्या ब्लू लाईन (मेट्रो लाईन 1) नंतर, गेल्या दशकात पूर्व उपनगरांमध्ये सुरू होणारी ही पहिली मेट्रो लाईन असेल. Yellow Line 2B ही पूर्व कॉरिडॉरला सेवा देणारी एकमेव नवीन लाईन म्हणून ओळखली जाते, तर उर्वरित लाईन पश्चिम उपनगरांवर केंद्रित करण्यात आली आहे. जरी सुरुवातीला पूर्ण ऑपरेशनची अंतिम मुदत डिसेंबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली होती, परंतु महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या देखरेखीखाली लवकर चाचणी सुरू करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.

Yellow Line 2B वर सिस्टिम टेंडर मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आल्याने डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मांडले मेट्रो ही पाच स्थानके सज्ज झाली आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा मार्ग चेंबूर येथे मुंबई मोनोरेलला जोडतो ज्यामुळे मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी वाढते. Under-Construction Metro Pillar Collapsed in Chembur: सुमन नगर भागात निर्माणाधीन मेट्रोचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही .

Yellow Line 2B मार्गासाठी नवीन 6 डब्यांच्या गाड्या Bharat Earth Movers Limited (BEML) द्वारे बनवण्यात आल्या आहेत. अहवालानुसार, या स्वदेशी बनावटीच्या गाड्यांमध्ये energy-efficient regenerative braking systems, ऑल-स्टील इंटिग्रल कोच आहेत आणि मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, आयपी-आधारित घोषणा, पाळत ठेवण्याची व्यवस्था आणि सायकलींसाठी जागा यासारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही सेवा, डायमंड गार्डन ते अंधेरीतील डीएन नगर पर्यंत असेल. 18.2 किमी लांबीची Yellow Line 2B, 14 स्थानकांसह, डिसेंबर 2026 पर्यंत सुरू होणार आहे.