Yavatmal Accident: यवतमाळमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी
Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

यवतमाळमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड जवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परत यवतमाळकडे जाणाऱ्या पाहुण्याच्या उभ्या वाहनाला ट्रकने जोराची धडक दिली. यात चार जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी पहायला मिळाली. (हेही वाचा - Tamilnadu Bus Accident: तामिळनाडूत बस उलटल्याने भीषण अपघात, 15 प्रवाशी जखमी; बचाव कार्य सुरु)

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य राबवण्यात आले. जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. अपघातात मृ्त्या झालेल्यांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश असून दोन्ही मुले एकाच घरातील असल्याने हळवळ व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातानंतर घटनास्थळी मोठ्यप्रमाणावर लोकांनी बचाव कार्यासाठी पोलिसांना मदत केली. यावेळी या ठिकाणी वाहतुक कोंडीचा सामना देखील करावा लागला. या अपघातात 10 जण गंभीर जखमी झाले असून या पैकी काही लोक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा हा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.