EY Pune: पुण्यात चार्टर्ड अकाउंटंट तरुणीच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली आहे. नवी नोकरी जॉईन केल्यानंतर अवघ्या 4 महिन्यात तरूणीचा मृत्यू झाल्याने तरूणीच्या आईने तिच्या मृत्यूचे खापर तिच्या कंपनीवर फोडले आहे. एना सेबेस्टियन पिरेयिल असं मृत तरूणीचं नाव आहे. मुळची केरळची असलेली एना कामानिमित्त पुण्यात गेली होती. अन्स्ट अँड यंग (Ernst and Young)या कंपनीत कामाला होती. कामाचा ताण (Work Pressure) असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे आईने न्हटले आहे. (हेही वाचा:McKinsey Employee Dies By Suicide: मुंबईत 25 वर्षीय IIT, IIM पदवीधर, मॅकिन्से कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाच्या प्रचंड ताणामुळे उचलले धक्कादायक पाऊल )
एना 'अन्स्ट अँड यंग' या कंपनीच्या एका फर्ममध्ये पुण्यातील शाखेत चार्टर्ड अकाउंटंट होती. एनाच्या आईने कंपनीचे प्रमुख राजीव मेमानी यांना पत्र लिहिलंय. ज्यात म्हटलं की, एनाने कंपनी जॉइन केल्यानंतर ती नेहमीच कामाच्या तणावाखाली रहायची. एनाने मार्च 2024 मध्ये कंपनी जॉइन केली होती. 6 जुलै रोजी पुण्यात सीए दीक्षांत समारंभामध्ये माझी मुलगी सहभागी होण्यासाठी पतीसोबत गेली होती. त्याठिकाणी अचानक तिच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, 20 जुलै रोजी मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समजली.
एनाच्या आईने पुढे म्हटलं की, 'पहिलीच नोकरी असल्यानं एनाने स्व:ताला कामात वाहून घेतले होते. कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती खूप काम करायची. परिणामी तिला शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण सहन करावा. विषेश म्हणजे त्या बदल्यात कंपनीकडून कोणतीच चांगली वागणूक तिला मिळाली नाही'. एका घटनेचाही उल्लेख एनाच्या आईने पत्रात केला आहे. 'एकदा तिला असिस्टंट मॅनेजरने रात्री कॉल केला आणि काम दिलं. सकाळपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं असं त्याने तिला सांगितले. त्यावर तिने विश्रांतीसाठी वेळ मागितला. तेव्हा तिला उत्तरात तू रात्री काम कर, आम्हीही हेच करतो'. असे सांगण्यात आले.
आईचे कंपनीवर गंभीर आरोपांचे पत्र
Heartbreaking news from EY Pune - a young CA succumbed to the work pressure and nobody from EY even attended her funeral - this is so appalling and nasty!!! pic.twitter.com/pt8ThUKiNR
— Malavika Rao (@kaay_rao) September 17, 2024
कामाच्या ठिकाणी असलेल्या तणावाबाबत त्या म्हणाल्या की, 'कामावरून एना खूप थकून घरी यायची. अनेकदा कपडे न बदलताच थेट झोपून जायची. तिच्याकडे रिपोर्टसाठी मेसेजेस यायचे. तिला कामाची आवड होती. ती सहज हार मानायची नाही. अनेकवेळी तिला ही नोकरी सोडून दुसरी शोधण्यास सांगितले', असं एनाच्या आईने म्हटलंय.