Mumbai Molestation Case: बोरिवली स्थानकावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एक व्यक्तीला अटक करण्यात आले आहे. ही घटना 5 जून घडली. आरोपीला रेल्वे पोलिसांनकडून अटक करण्यात आले आहे. दीपक गौतम (44) असं आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय दंज संहिता कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवरच्या अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याने महिला असुरक्षित असल्याचे चित्र दिसत आहे. (हेही वाचा- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आमदाराच्या 2 कार्यकर्त्यांना अटक)
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी पीडित महिला लोकल ट्रेनने चर्चगेट येथील कार्यालयात जात होती. ती प्लॅटफॉर्मच्या बाजूला खिडकीच्या सीटवर बसली होती. ट्रेन सकाळी 9.30 च्या सुमारास मालाडा थांबली. आरोपीने तिला रेल्वेच्या खिडकीजवळ जाऊन विचारले की, तू माझ्याशी शारिरिक संबंध ठेवशील का? घाबरलेल्या पीडित महिला तात्काळ ट्रेनमधून उतरली आणि रेल्वे स्थानकावर असलेल्या रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांना सर्व घटना सांगितली. रेल्वे पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर गोंधळ निर्माण झाला होता.
या पूर्वी एप्रिल महिन्यात मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये महिला योग शिक्षकाचा विनयंभग केला होता. या प्रकरणी पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले. महिला आपल्या मित्रासोबत जनरल डब्ब्यातून प्रवास करत होती. गर्दीचा फायदा घेत आरोपीने महिलेला अयोग्य पध्दतीने स्पर्श केला होता.