Mumbai Building Collapse: मुंबईतील ग्रँड रोड परिसरात रुबिनिसा मंझिल या चार मजली इमारतीचा काही भाग सकाळी अकराच्या सुमारास कोसळला(Building Collapse). यात बाल्कनी, दुसऱ्या आणि तिसऱ्या फ्लोअरचा स्लॅब यांचा समावेश आहे. ही खूप जुनी इमारत होती. ती जिर्ण झाल्याने ही दुर्घटना घडली. सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर, 3 जखमी झाले आहेत. सकाळची वेळ असल्याने परिसरात नागरिकांची ये-जा सुरु होती. अचानक काही समजन्याआधी इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळला. त्यावेळी काही जण अडकल्याची भिती व्यक्त करण्याती आली होती. विशेष म्हणजे म्हाडाची इमारत असून म्हाडाने या इमारतीला धोका असल्याची कुठलीही नोटीस बजावली नव्हती. (हेही वाचा: Tulsi Lake Overflow: मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव ओव्हरफ्लो)
1 dead, three injured as a portion of building collapses near Grant Road West Railway Station, Mumbai.
The incident happened at nearly 10.55 am today.#Mumbai pic.twitter.com/4pMOAO574t
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) July 20, 2024
मुंबईत अनेक भागात पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. राज्यात काही ठिकाणी पूर परिस्थिती ही निर्माण झाली आहे. अंधेरी तर सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान घटना घडल्यानंतर तात्काळ तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. महानगरपालिकचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अजूनही तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत.