राज्यभरात थंडीने हुडहुडी भरली आहे. विशेष विदर्भासह नागपूरने राज्यातील इतर शहरांपैकी तापमानात निच्चांक गाठला आहे. तरी नागपूरच्या गुलाबी थंडीत मात्र आजपासून राजकीय वातावरण तापणार आहे.कारण आजपासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्यामुळे आजपासून सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना राज्यात रंगणार आहे. तरी या अधिवेशनातून सर्वसामान्यांना काय मिळणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. राज्य सरकार सह विरोधक या अधिवेशानासाठी सज्ज झालं आहे. गेल्या अधिवेशनातील सर्वाधिक लक्षात राहणारं वाक्य म्हणजे पन्नास खोके एकदम ओके. आता या अधिवेशनातही विरोधक शिंदे गटापुढे पन्नास खोक्यांचा नारा लावणार का किंवा शिंदे गट या आरोपाचं निरासरन करु शकणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न,विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांचे कर्ज, महाराष्ट्रातील प्रकल्प आणि उद्योगधंदे, रोजगार हे मुद्दे विरोधक हिवाळी अधिवेशनात लावून धराणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. तरी उद्यापासुन महाराष्ट्राच्या राजकारणात हिवाळी अधिवेशना दरम्यान सत्ताधारी विरुध्द विरोधक अशी खडाजंगी बघायला मिळणार आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Cabinet Decision: महाराष्ट्र सरकार लोकायुक्त विधेयक आणणार, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय)
विरोधकांकडून हिवाळी अधिवेशन तिन आठवड्याचं घेण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तरी आता हे अधिवेसन किती कालावधीसाठी होईल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला म्हणजेच काल होणाऱ्या चहापानच्या कार्यक्रमावर देखील विरोधकांनी बहिष्कार घालत अदिवेशनातील खडाजंगदीचं बिगुल वाजवलं होतं . हिवाळी अधिवेशनात कोण कोणावर भारी पडणार राज्यकर्ते की विरोधक हे बघणं अधिक रोमांचक ठरणार आहे.