पश्चिम रेल्वेचे कर्मचारी (Photo Credit : Twitter)

पश्चिम रेल्वेने (Western Railway) आपल्या ग्रुप डि (Group D) च्या कर्मचाऱ्यांना परदेशवारीचे खास गिफ्ट दिले आहे. 52 कर्मचाऱ्यांना या परदेशवारीसाठी पाठवण्यात आलं आहे. थायलँडच्या पाच दिवसाच्या ट्रिपचा 67% खर्च रेल्वे करणार आहे. या 52 कर्मचाऱ्यांमध्ये 20 महिला आणि 28 पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. तर चार टूर कॉर्डिनेटर्स आहेत.

ग्रुप डि मध्ये गँगमन, ट्रॅकमन आणि सफाई कामगार यांचा सहभाग असतो. कर्मचाऱ्यांना परदेश दौऱ्याचे गिफ्ट देण्याची पश्चिम रेल्वेची ही पहिलीच वेळ आहे.

पश्चिम रेल्वेने 'थॉमस अँण्ड कूक' यात्रा कंपनीसोबत करार केला असून त्याअंतर्गत या परदेश वारीचे गिफ्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आले. या ट्रिपचा 67% खर्च करत रेल्वेने कर्मचाऱ्यांना टी-शर्ट, टोप्या आणि ट्रॉली बॅग्सही दिल्या आहेत. कर्मचारी कल्याण निधीतून या सहलीचं आयोजन करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांना फक्त 33% रक्कम भरावी लागणार आहे.