Western Railway Recruitment: मुंबईत सहाय्यक लोको पायलट, टेक्निशियनसह विविध पदांसाठी 306 जागांवर होणार भरती
Western Railway (Photo Credits: File Photo)

खुशखबर! पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) मुंबईतील विविध पदांसाठी 306 जागांवर भरती होणार आहे. यात टेक्निशियन ग्रेड-III साठी 221 जागा तर सहाय्यक लोको पायलट साठी 85 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारंनी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबरपर्यंत असेल. त्याचबरोबर हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे गरजूंनी तसेच इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावे.

तसेच या पदांवरील उमेदवारास सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी ठरविली जाईल. या पदासाठी 10 वी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील एस.एस.एल.सी.कोर्स किंवा आय.टी.आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 1 जानेवारी 2020 रोजी 18 वर्षे ते 42 वर्षे पूर्ण झालेली असावीत. तसेच SC/ST मध्ये 5 वर्षे आणि OBC मध्ये 3 वर्षे अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा- खुशखबर! सरकारी बँकांमध्ये तब्बल 12,899 पदांसाठी नोकर भरती; जाणून घ्या बँकांची नावे, कुठे कराल अर्ज आणि इतर माहिती

कसा भराल ऑनलाईन अर्ज:

1. RRC-WR म्हणजेच www.rrc.wr.com या संकेतस्थळाला भेट द्या.

2. त्यानंतर Online/E-Application या पर्यायावर क्लिक करा

3. 'New Registration' वर क्लिक करा

4. त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. त्यात तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरा. तुमचे पुर्ण नाव, जन्मतारीख, जात, ईमेल आयडी, पत्ता आणि मोबाईल क्रमांक ही सर्व माहिती अचूक भरा.

5. पूर्ण माहिती भरून Submit केल्यावर तुमच्या रजिस्टर केलेल्या मेल आयडीवर एक मेल Confirmation चा मेल येईल. त्यावरील लिंक वर क्लिक करून पुढील प्रक्रियेसाठी हो म्हणा.

6. त्यानंतर ईमेलवर आलेल्या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉग इन करा.7. त्यानंतर सांगितलेल्या सूचनांप्रमाणे तुमचा अर्ज भरा

8. त्यात तुमचा (3.5 cmX3.5cm, 70kb ,100DPI, चा JPEG) फॉर्मेट मधील फोटो अपलोड करा.

9. त्यानंतर तुमची स्कॅन केलेली सही (3.0cmX6.0cm 30kb JPEG) फॉर्मेट मधील अपलोड करा.

10. त्याचबरोबर संबंधित स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा. सर्व माहिती आणि जोडलेली कागदपत्रे सर्व नीट तपासून घ्या.

11. त्यानंतर Submit बटनावर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज भरताना काही अडचण आल्यास www.rrc.wr.com संकेतस्थळाला भेट द्या.