Lower Parel Bridge (Photo Credits: ANI)

लोअर परेल ( Lower Parel ) स्टेशन जवळील Delisle Bridge ट्राफिकसाठी सहा महिने बंद केल्यानंतरआता पश्चिम रेल्वेने (Western Railway) नवा ब्रिज बांधण्यासाठी खास टेंडर जाहीर केलं आहे. पुढील काही महिन्यात टेंडरवर शिक्कामोर्तब होईल आणि त्यापुढे दहा महिन्यात ब्रीज बांधून पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी 84 कोटी खर्च करण्यात येण्यात आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात मुंबईकरांच्या दिमतीला नवा ब्रीज असेल.

वरळीकडून दक्षिण मुंबईकडे प्रवास करण्यासाठी, कॉर्परेट क्षेत्रातील अनेक महत्त्वाची कार्यालयं लोअर परेल भागात असल्याने सामान्य मुंबईकरांच्या ट्राफिकमध्ये भर पडली आहे. आयआयटी मुंबईद्वारा हा ब्रीज धोकादायक असल्याचं जाहीर केल्यानंतर वाहतुकीसोबतच पादचार्‍यांसाठीही हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता. 20 ऑगस्ट 2018 पासून या ब्रीजवरील धोकादायक भाग पाडायला सुरूवात झाली आहे. या ब्रीजचे काम 15 फेब्रुवारी 2019 पर्यंत सुरू राहील. दरम्यान या ब्रीजचे महत्त्वाचे पिलर हटवण्याचं काम पुढील महिन्यात होणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणार्‍या महत्त्वाच्या ब्लॉकदरम्यान ब्रीजवरील पिलर काढले जातील. तसेच बोरीवली आणि मुंबई सेंट्रलदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात येणार आहे. यादरम्यान लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 267 मीटर लांब या ब्रीजवर 2 मीटरचे पादचारी रस्ते राखीव ठेवण्यात आले आहेत.