Nashik Gangapur Dam: गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे गंगापूर धरण( Gangapur Dam) 93.4 टक्के भरले आहे. जर दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कोणत्याही क्षणी धरण भरण्याची शक्यता आहे. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून टप्याटप्याने गोदावरी नदीत(Godavari River)विसर्गात वाढ केली जात आहे. कालही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. तर दुपारी एक वाजेपासून 2 हजार 382 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आजही धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज)
यामुळे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेले आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी जीव धोक्यात घालून पर्यटन करू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु राहिला तर टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
२७ तारखेपर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra: Continuous rainfall and water release from Gangapur Dam have caused severe flooding in Nashik's Godavari River, submerging key temples pic.twitter.com/LCxpsWPlYX
— IANS (@ians_india) August 25, 2024
नाशिकमध्ये दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. आत्तापर्यंत 22.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागायाने मंगळवार २७ पर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस जिल्ह्यात पाऊस असणार आहे. पावसाने जिल्ह्यात मुक्काम वाढविला असून, शनिवारी (ता. २४) शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी नोंदविली.