
बीड (Beed) मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना तुरूंगात मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये दोन गटांमध्ये वाद झाला आणि त्यामधून कैद्यांनी या दोघांना चोपल्याचं वृत्त आहे. ही मारहाण बाबन गिते गॅंगमधील महादेव गिते आणि अक्षय आठवले यांच्यात झाल्याची माहिती आहे. हे दावे सुरेश धस यांनी केले आहेत.
बीड कारागृहातील दोन गटांमधील वादाबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आज सकाळी वाद झाला आणि जेल मधील पोलिसांनी मध्यस्थी करून तो वाद टाळल्याचं सांगण्यात येत आहे. Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी; CID च्या आरोपपत्रात खुलासा.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, फोन लावण्याचं कारण झालं आणि दोन गटांमध्ये वाद सुरू झाला. यामध्ये वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही. या घटनेत कोणीही जखमी नाही. अशी माहिती कारागृह पोलिस महासंचालक जालिंदर सुपेकर यांनी दिली आहे.
पहा सुरेश धस यांचा दावा
View this post on Instagram
बबन गिते कोण आहे?
बबन गीते हा एका खून प्रकरणातील फरार आरोपी आहे. बबन गिते जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहे. बीड मध्ये मुंडे कुटुंबानंतर या गीतेची पकड आहे. बबन गितेला मानणारा मोठा वर्ग परळी तालुक्यात आहे. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गिते याच्यासह मुकुंद गिते, महादेव गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख यांच्या खंडणीच्या वादातून डिसेंबर 2024 मध्ये हत्या झाली. या हत्येमागे वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचा सीआयडीचा तपास सांगतो. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून अत्यंत निर्दयीपणे त्यांनी संतोष देशमुखचा खून केला आहे. सध्या न्यायालयात फास्ट ट्रॅकवर खटला सुरू आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सार्याच स्तरातून मागणी केली जात आहे.