कुत्रा (Dog) हा मानवाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणीत प्राणी म्हमून ओळखला जातो. मानसाच्या सानिध्यात राहून कुत्राही चांगलाच मानसाळतो आणि वेळप्रसंगी तो मानवाप्रमाणे कृतीही करतो. याचेच उदाहरण दर्शवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत दिसते की, कुत्रा हा मानवाप्रति किती विचारपूर्वक आणि प्रामाणीक वागतो. व्हिडिओत दिसणारा कुत्रा एका दिव्यांग व्यक्तीची मदत करताना दिसतो. हा कुत्रा एका दिव्यांग व्यक्तीला खड्ड्यात पडण्यापासून वाचवताना दिसतो.
व्हिडिोत आपण पाहू शकता की, एक अंध व्यक्ती रस्त्याने निघालेला असतो. रस्त्याखाली असलेले गटारीचे झाकन उघडे असते. हा व्यक्ती दिव्यांग असल्याने त्याला रस्ता निटसा कळत नाही. हातातील पांढऱ्या काठीच्या अंदाजाने तो पुढे निघालेला असतो. पुढे असलेल्या खड्ड्यात तो पडणार इतक्यात एक कुत्रा तिथे येतो आणि खड्याच्या बाजूला तो झोपतो. दिव्यांग व्यक्ती काठी टेकत पुढे येत असताना ती काठी कुत्र्याला लागते. तो थोडासा थांबतो आणि दिशा बदलतो. नंतर कुत्रा उठतो आणि त्याची काठी तोंडात पकडतो आणि त्याला योग्य दिशेने घेऊन जातो. कुत्र्याची ही मानवता पाहून अनेकांनी सोशल मीडयावर या व्हिडिओचे कौतुक केले आहे. (हेही वाचा, Dog-Bitch Marriage: ऐकावं ते नवलचं! कुत्रा-कुत्रीच्या लग्नात 500 वऱ्हाडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हिंदू रीतिरिवाजानुसार पार पडले सर्व विधी)
ट्विट
That's incredible I want to cry! Dogs 💕❤️pic.twitter.com/dYZbqNYnmQ
— Figen (@TheFigen) July 11, 2022
सोशल मीडियावर हा व्हिडिओ TheFigen नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 7 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यासबतच तितक्याच लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. एका युजर्सने व्हिडिओखाली दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, अगदीच हृदयस्पर्षी असा हा व्हिडिओ आहे. आणखी एकायुजरने म्हटले आहे की, हा कुत्रा तर मानसापेक्षाही चांगला आहे.