Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर, 26 होणार जूनला मतदान

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad) 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर,तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी 26 जूनला मतदान होणार आहे, तर 1 जुलै रोजी मतमोजी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.  (हेही  वाचा - Maharashtra Government seeks Relaxation in Model Code of Conduct: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ मदत करण्यासाठी राज्य सरकार कडून भारत निवडणूक आयोगाला पत्र लिहून आचारसंहितेला शिथिल करण्याची मागणी)

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम

31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार

10 जून रोजी अर्जाची छाननी

12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार

26 जून रोजी मतदान होणार

1 जुलै रोजी होणार मतमोजणी