Close
Search

Vidarbha Unseasonal Rain: अवकाळी पावसाने विदर्भात शेतपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपिकांचं आणि संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालेलं असतानाच, शेतीतील माती अजूनही ओलीच आहे.

महाराष्ट्र Amol More|
Vidarbha Unseasonal Rain: अवकाळी पावसाने विदर्भात शेतपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
photo credit -x

महाराष्ट्राच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावण्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. विदर्भात शेतातील उभ्या पिकांचं नुकसान तर केलं आहेच. पण यंदाच्या हंगामात कापसाची लागवड कशी कशी करायची असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. ढगाळ वातावरण आणि ओली झालेली माती कापसाच्या लागवडीला मारक ठरण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत. विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतीची ही अशी दैना केली आणि कापसाच्या पेरणीसाठी सज्ज झालेला शेतकरी या जमिनीकडे हताश नजरेने बघत बसलाय. (हेही वाचा -  Maharashtra Unseasonal Rain: अवकाळी पावसानं विदर्भासह मराठवाड्याला झोडपलं, बीडमध्ये 500 कोंबड्यांचा मृत्यू)

विदर्भात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भाजीपिकांचं आणि संत्र्यांच्या बागांचं नुकसान झालेलं असतानाच, शेतीतील माती अजूनही ओलीच आहे. येत्या काळात पावसाने उसंत घेतली नाही तर जून महिन्यात कपाशीची लागवड कशी करायची अशा गहन प्रश्नात शेतकरी अडकलाय. विदर्भात साधारणतः अक्षय तृतीय नंतर कापसाच्या पेरणीला सुरुवात होते. मात्र सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जमीन ही अजूनही ओलीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जर पावसाने उघड दिली नाही तर ओल्या जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

विदर्भात कपाशीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. दरवर्षी अक्षय्य तृतीयेनंतर कपाशीच्या पेरणीला सुरूवात होते. मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलंय. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी आणि ढगाळ वातावरणात तापमानाचा पाराही 40 अंशांच्या वर जात नसल्याने मातीचा ओलावाही कमी होत नाही.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change

चर्चेतील विषय

ICC World Cup 2023Coranavirus in MaharashtraFact checkSharad PawarCM Eknath ShindeCoronavirusकोविड 19 लस
Close
Latestly whatsapp channel