Mumbai latest News: नालासोपारा येथील बांधकाम व्यावसायिक अली असगर भानपूरवाला हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या आरोपी उमर शेख याची मुंबई सत्र न्यायालयाने ( Sessions Court) निर्दोष मुक्तता केली आहे. पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या पतीच्या हत्या प्रकरणात (Murder Case) तो पाठिमागील 7 वर्षांपासून तुरुंगात होता. कोर्टाने त्याला सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडले. उमर शेख याच्यावर आरोप होता की, त्याने भानपूरवाला यांची हत्या आणि इतर तिघांना हल्ला करुन गंभीररित्या जखमी केल्याचा आरोप होता. घटना घडली त्या वर्षी मुंबई पोलिसांनी आरोपीस त्याच्या अंधेरी येथील नातेवाईकाच्या घरातून अटक केली होती.
नेमके प्रकरण काय?
उमर शेख आणि बिस्मिल्ला यांचा विवाह झाला होता. मात्र, काही कारणांवरुन दोघांमध्ये सन 2013 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर बिस्मिला हिने व्यवावसायिक अली असगर भानपूरवाला (37) याच्यासोबत विवाह केला. दरम्यान, उमर याच्या मनात काही कारणांमुळे राग होता. या रागातून त्याने जोगेश्वरी येथील इमारतीमध्ये 15 व्या मजल्यावर असलेल्या भानपूरवाला याच्या घरात प्रवेश करुन त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये भानपूरवाला गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. दरम्यान, पोलिसांनी कोर्टात सांगितले की, आरोपी उमर शेख याने त्याची माजी पत्नी बिस्मिल्ला हिलाही मारहाण करून गंभीर जखमी केले. बिस्मिल्लाच्या दोन भाच्यांच्या उपस्थितीत हा गुन्हा घडल्याचे पोलिसांनी सांगितले. शेखला सायंकाळी त्याच्या नातेवाईकाच्या अंधेरी येथील घरातून अटक करण्यात आली. दरम्यान, सर्व साक्षी पुरावे पाहिल्यानंरत कोर्टाने या प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, हत्या घडली तेव्हा व्यावसायिक भानपुरवाला यांच्या पश्चात बिस्मिल्ला हिच्याव्यक्तिरीक्त त्यांची पहिली पत्नी आणि दोन शाळेत जाणारी मुले होती. त्या वेळी ती जी माझगावच्या एका आलिशान इमारतीत राहत असत. विशेष म्हणजे पोलिसांनी सांगितले की, भानपुरवाला यांच्या दुसऱ्या लग्नाबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. पोलिसांकडून भानपूरवाला यांच्या पहिल्या पत्नीला आणि मुलांना जेव्हा त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा त्यांना त्यांच्या दुसऱ्या लग्नाची माहिती नसल्याने त्यांना धक्काच बसला. पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी असे दिसते की, त्यांचा घटस्फोट झाल्यापासून शेख बिस्मिल्लाहवर नाराज होता आणि 15 फेब्रुवारी रोजी भानपुरवालाशी झालेल्या लग्नामुळे शेख आणखी नाराज झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी आठच्या सुमारास उमर शेख हा दाम्पत्याच्या आयरिश टॉवर येथील जोगेश्वरी येथे गेला. त्याच्याकडे चाकू होता आणि त्याने बुरखा, बांगड्या आणि लिपस्टिक लावली होती. सकाळची वेळ असल्याने सुरक्षा रक्षकांनी गृहीत धरले की ही घरातील नोकर आहे. बिस्मिल्लाने दरवाजा उघडताच शेखने तिला मारहाण केली. बिस्मिल्लाने मदतीसाठी हाक मारत आत धाव घेतली आणि स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले. हा गोंधळ ऐकून भानपूरवाला शेखचा सामना करण्यासाठी बाहेर आला, मात्र शेख यांच्या पोटात शेक याने चाकुचे तीन ते चार वार केले. बिस्मिल्लाही बाहेर आला पण शेखने तिच्यावर पुन्हा हल्ला केला,” असे सहायक पोलिस आयुक्त अरुण चव्हाण यांनी प्रसारमाध्यामांशी बोलताना घटना घडल्यानंतर तपासावेळी सांगितले.